Top News आरोग्य कोरोना

‘मी वरिष्ठ मंत्र्याच्या कामात लुडबुड करत नाही’; कॉल करणाऱ्या शेतकऱ्याला अजित पवारांचं उत्तर

अहमदनगर | अहमदनगरमधील एका शेतकऱ्याने पाण्याच्या प्रश्नावर थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कॉल केला. शेतकऱ्याने अजित पवार यांच्याकडे ऊस जळून जात असल्याची व्यथा सांगत कुकडी प्रकल्पात पाणी सोडण्याची मागणी केली.

अजित पवार यांनी आपण कुठल्याही वरिष्ठ मंत्र्याच्या कामात लुडबुड करत नसल्याचं स्पष्ट करत जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांच्याशी बोलायला सांगितलं आहे.

शेतकऱ्याचा आणि अजित पवार यांच्या संभाषणाची क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या क्लिपमधील शेतकऱ्याचं नाव मारुती भापकर असं आहे. मी श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा या गावातील रहिवासी आहे. राहुल जगताप यांच्या गावाशेजारीच माझं गाव आहे. कुकडीचं आवर्तन आणखी 15 दिवसांनी सोडणार म्हणत आहेत. मात्र ऊस आणि इतर बाकीची पिकं जळून चालली आहेत, असं मारुती भापकर अजित पवारांनी सांगितलं.

ते खातं माझ्याकडं नाही, जयंत पाटील यांच्याकडं आहे. त्यांनी याची बैठक घेतली होती. ज्यावेळी माझे सहकारी, माझे प्रांताध्यक्ष बैठक घेतात त्यावेळी मी त्यात जास्त लुडबुड करत नाही. जयंत पाटील यांना बोलावं लागेल. राहुल जगताप यांना जयंत पाटील यांच्याशी बोलण्यास सांगा, असं अजित पवार म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या-

मला सरकारची चिंता नाही… सरकार कुणी पाडू शकत नाही- उद्धव ठाकरे

“जवळपास 28 हजार रुग्ण बरे झालेत, महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कारस्थान पाहून दु:ख होतं”

महत्वाच्या बातम्या-

अक्षय बोऱ्हाडे-शेरकर वादाच्या कलाटणीनंतर मिटकरींची गरमागरम फेसबुक पोस्ट!

बॉलीवूडचा दिग्गज गायक कोरोनाने हिरावला, संपूर्ण बॉलीवूड शोकसागरात

परप्रांतीय कामगारांना परत आणण्याची जबाबदारी उद्योजकांनी घ्यावी- नितीन गडकरी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या