Loading...

अजित पवारांचा मोठा निर्णय, या निवडणुकीतून माघार

मुंबई | मी जे काम हाती घेतो ते जबाबदारीने पार पाडतो. राज्यातील विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. मी भारतीय कबड्डी महासंघाला वेळ देऊ शकणार नाही त्यामुळे ते पद घेणं मला उचित वाटत नाही, असं म्हणत महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपण भारतीय कबड्डी महासंघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

भारतीय कबड्डी महासंघाच्या मुख्य निवडणुकीसाठी 17 ऑगस्टपर्यंत संबंधित संघटनांनी प्रत्येकी 2 नावं पाठवायची आहेत. राज्य कबड्डी संघटनेने आस्वाद पाटील यांचं नाव निश्चित केलं आहे. तर दुसऱ्या नावाबाबत अजून चर्चा सुरू आहे.

Loading...

माझं नाव या निवडणुकीसाठी राज्य संघटनेने निश्चित केलं आहे. अजित पवारांनी नकार दिल्याने दुसऱ्या नावासाठी चाचपणी सुरू आहे, असं राज्य कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह आस्वाद पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अजित पवारांनी ही निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर आता या निवडणुकीच्या रिंगणात राज्य कबड्डी संघटना कोणाला उतरवतं, हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Loading...

व्हॉट्सअपवर बातम्या हव्या असतील तर 8275536080 हा नंबर सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवर Start असा मेसेज पाठवा…

महत्वाच्या बातम्या-

-अटल बिहारी वाजपेयींचा पहिला स्मृतिदिन; राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून श्रद्धांजली अर्पण

-प्रत्येक रक्षाबंधनाला पंकजा आणि प्रितमताई या दोघींचीही आठवण येते- धनंजय मुंडे

Loading...

-शरद पवारांना वाटतं आम्हीच ज्ञानी आहोत- विखे पाटील

-बापाला शुभेच्छा देणार नाहीस का?; ट्विटरवर ट्रेंड सुरु

-पबजी खेळण्याचं व्यसन लागलं; अन् त्यासाठी चोरल्या 8 सायकली

Loading...