Ajit Pawar | महाराष्ट्रात सध्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरु आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ‘टप्प्यात आलं की करेक्ट कार्यक्रम’ हा जयंत पाटील यांचा डायलॉग सर्वत्रच प्रचलित आहे. यावरूनच अजित पवारांनी त्यांना खोचक शब्दात टोला लगावला. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जातोय. या विरोधात माळशिरसमधील मारकडवाडीत आंदोलन करण्यात येत आहे. (Ajit Pawar)
या आंदोलनावर बोलताना अजितदादा यांनी जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. “निवडणुकीवेळी बरेच जण स्टेजवर संविधान हातात घ्यायचे. मग ज्यांच्या हाती संविधान नाही त्यांना आदर नाही का? अनेकांनी संविधानातील तरतुदी वाचल्याच नाहीत. सदस्यांनी स्थान ग्रहण करण्यापूर्वी शपथ घेणं आवश्यक आहे. आता विरोधकांची भूमिका नियम बाह्य नाही का? उगीच काही तरी स्टंटबाजी करायची. कधी तरी लक्षात घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झाला आहे”, असं अजित पवार म्हणाले.
काय म्हणाले अजित पवार?
नागपूर अधिवेशनात आमची बाजू खरी आहे हे दाखवून देईल. लोकसभेत आमच्या जागा कमी आल्या तेव्हा आम्ही रडलो नाहीत. 31 जागा आल्या तेव्हा ईव्हीएम गारगार वाटत होतं, आता गार वाटतंय की गरम ते तुमचं तुम्हीच बघा, असंही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.
दरम्यान, आज (9 डिसेंबर) राज्याच्या विशेष अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली. यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
एकनाथ शिंदे यांची तूफान फटकेबाजी
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी मविआवर निशाणा साधला. गेल्यावेळी सभागृहात विरोधी पक्ष चांगल्या कामाला पाठिंबा देत होतं. सरकार चुकत असेल तर कान धरण्याचं काम केलं. आता तर विरोधीबाकावरची संख्या चिंताजनक आहे. असं व्हायला नको होतं. अशाच काळात विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा आली आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
यावेळी त्यांनी देखील बॅलेटपेपरवर फेरमतदान करण्याच्या विरोधकांच्या मागणीवर देखील भाष्य केलं. “लोकसभेला विरोधकांनी बॅलेटपेपरवर फेरमतदान का मागितलं नाही. तेव्हा बुलेटवर सर्वजण स्वार झाले. किती राज्य तुम्ही जिंकलात, हरलो की ईव्हीएमवर आरोप करायचा. गेल्या अडीच वर्षांत तुम्ही आमच्यावर आरोप करत होतात, आता त्या निर्जिव ईव्हीएमवर आरोप करत आहात.”, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. (Ajit Pawar)
News Title : Ajit Pawar on jayant patil
महत्वाच्या बातम्या –
शिंदे गटाला राष्ट्रवादीपेक्षा जास्त खाती मिळणार?, मोठी माहिती समोर
एकनाथ शिंदे नवा डाव टाकणार? ‘या’ कारणामुळे 5 नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार
लाडक्या बहिणींच्या अर्जांची तपासणी होणार की नाही? तटकरेंनी दिली माहिती
ते ही पुन्हा आले! विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलमध्ये मोठी घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर