मला भावी मुख्यमंत्री म्हणू नका; अजित पवारांची कार्यकर्त्यांना कळकळीची विनंती

बारामती | मला भावी मुख्यमंत्री आणि पवार साहेबांना भावी पंतप्रधान म्हणू नका, अशी विनंती चक्क राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केली आहे. ते बारामतीतील पणदरे येथील मंगल कार्यालयाच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. 

कार्यकर्ते चांगल्या भावनेनंच भावी पंतप्रधान आणि भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करत असतात. मात्र त्यामुळे मित्रपक्षाच्या भावना दुखावल्या जावू शकतात, असं ते म्हणाले. 

येणाऱ्या काळात पाय जमिनीवर ठेवून काम करा. काँग्रेस-राष्ट्रवादीला बहुमत कसं मिळेल याकडे लक्ष द्या, असा सल्लाही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला. 

दरम्यान, पाडापाडीमुळे आपली माती झाली, असं सांगायला ते विसरले नाहीत. मात्र प्रसारमाध्यमांचे कॅमेरे पाहून त्यांनी आवरतं घेतलं.

महत्वाच्या बातम्या –

-कोण जिंकणार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी?, काय आहे सद्यस्थिती??? 

भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा; सिंधूनं साऱ्या देशाची मान उंचावली

-राफेल प्रकरणी ‘भाजप’ देशभरात एकाच वेळी करणार ही रेकाॅर्डब्रेक कृती

-…म्हणून आम्ही हरलो; भाजपच्या खासदारानं कबुल केली हार

-कितीही शर्यत केली तरी ते जिंकू शकत नाहीत; कारण आमचं वजनच वेगळं!