संतापलेले अजित पवार छताचा तुकडा घेऊन सभागृहात!

मुंबई | मुंबईतील मनोरा आमदार निवासातील आमदार सतीश पाटील यांच्या खोलीतील छताचा काही भाग आज सकाळी कोसळला. यामुळे संतप्त झालेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार चक्क छताचा काही भाग घेऊन सभागृहात पोहोचले.

आजच आमदार निवास खाली करुन आमदारांच्या राहण्याची पर्यायी व्यवस्था करा, अशी मागणी यावेळी अजित पवार यांनी केली. 

तसेच बरं झालं तिथं कुणी झोपलं नव्हतं नाहीतर आजच आपल्यावर श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली असती, असं म्हणून त्यांनी या मुद्द्याकडे सरकारने गांभीर्याने पहावे, असं सांगितलं.

पाहा अजित पवार काय म्हणाले-

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या