Ajit Pawar 7 - 'भाजप'च्या असल्या सेलिब्रेशनची मला कीव येते- अजित पवार
- महाराष्ट्र, मुंबई

‘भाजप’च्या असल्या सेलिब्रेशनची मला कीव येते- अजित पवार

पुणे | नोटाबंदीच्या निर्णयाचे भाजप सेलिब्रेशन करतय. असल्या सेलिब्रेशनची कीव येते, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधलाय.

नोटबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर काळा पैसा बाहेर येईल असा पंतप्रधानांनी दावा केला होता. मात्र अद्यापही त्याची आकडेवारी सरकारनं किंवा रिझर्व बॅंकेनं जाहीर केलेली नाही.

दरम्यान, हा निर्णय नक्की कोणासाठी घेतला होता? असा प्रश्न उपस्थित करत श्रीमंत लोकांनी काळा पैसा पांढरा केला असून, कॅशलेश व्यवहार झालाच नाही, असही ते म्हणाले.

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा