राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात यापुढे मुख्यमंत्र्यांना प्रवेशबंदी!

मुंबई | 2019 पर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याच्या सत्कार समारंभात बोलावणार नाही, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिलीय. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या सत्कार समारंभाला यापूर्वी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण असायचं, मात्र त्यामुळे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होतो. आम्हाला अनेकदा त्याबाबत विचारणाही झाली, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं अजित पवारांनी सांगितलं. 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांसोबत आमचं कुठलंही भांडण नाही, एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी जाणं ही आपली संस्कृती आहे, असं स्पष्टीकरणही अजित पवार यांनी दिलं.