Top News महाराष्ट्र

पंढरपूरच्या दुर्घटनेस जबाबदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; अजित पवारांचे आदेश

पुणे | पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित जिल्हाधिकारी तसेच पालिका आयुक्तांकडून परिस्थितीचा आढावा घेतला. कोकण, पश्चिम व मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, विदर्भासह अनेक भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ सुरु करण्यास सांगण्यात आलंय.

दरम्यान पंढरपूरच्या कुंभारघाटावरील भिंत कोसळून झालेल्या सहा जणांच्या मृत्यूची चौकशी करावी. तसंच दुर्घटनेतील दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून देण्यात आले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून सतर्क राहण्याचे आणि बचाव, मदतकार्य तत्परतेने करण्याचे निर्देश दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

पुण्यात ओढ्याला आलेल्या पुरामध्ये चार तरुण वाहून गेले!

 “राज्यपाल पदावरील व्यक्तीने कसं वागू नये ते भगतसिंह कोश्यारी यांनी दाखवून दिलंय”

 ’15 वर्षे काय मटार सोलत होतात काय?’; राबडी देवींचा मोदींना टोला

 “..त्यावेळी भाजप तिथे आला अन् म्हणाला, हे मी करतो तोपर्यंत तुम्ही ड्रीम 11 वर टीम बनवा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या