बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लोकांची थोडी मानसिकता केली पाहिजे ना?; अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य

पुणे | पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे पुण्यात लॉकडाऊन होणार का?, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात येऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन पुण्याच्या लॉकडाऊनबाबत भाष्य केलं.

पुण्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असून लोकांनी नियम काटेकोरपणे पाळावेत अन्यथा एक-दोन एप्रिलला आम्हाला पुण्यात लॉकडाऊन लावावा लागेल, असा इशारा अजित पवार यांनी पुणेकरांना दिला. मात्र अजित पवार यांनी एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरामुळे पुण्यात लॉकडाऊन लागणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

पुण्यात रुग्णांची संख्या एवढी वाढतेय, मात्र तरीही आज आपण निर्बंध लावण्यासंदर्भात कोणताच निर्णय घेतला नाही, अशा आशयाचा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर “पाठीमागचा अनुभव असा होता, की दोन तीन दिवस आम्हाला आधी सांगितलं असतं तर आम्ही खबरदारी घेतली असती, अशा लोकांच्या प्रतिक्रिया होत्या. आज आत्ता सांगितलं असतं लॉकडाऊन लावला तर संध्याकाळी तुम्हाला घरी जाऊन जेवायला भेटलं नसतं. तोपर्यंत आता ते घरात धान्य-बिन्य आणून ठेवतील, भाजीपाला ठेवतील, थोडी त्यांची मानसिकता पण केली पाहिजे ना?. एवढं मोठं शहर आहे. दिवसभर काम केल्यावर चूल पेटते, असा मोठा वर्ग आहे, त्याचाही विचार करावा लागतो. “

अजित पवार यांची आजची पत्रकार परिषद पुणकरांसाठी अल्टिमेटम मानली जात आहे, मात्र अप्रत्यक्षपणे त्यांनी आज पुणेकरांनी नियम न पाळल्यास आणि कोरोना रुग्णांची संख्या कमी न झाल्यास एक किंवा दोन एप्रिलला लॉकडाऊन लावण्यासंदर्भात निर्णय घ्यावा लागेल, असं स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मॉलमधील आगीत होरपळून ठार झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांची मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी, म्हणाले…

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल

वनअधिकारी दिपाली चव्हाणांची मन सुन्न करणारी सुसाईट नोट आली समोर!

‘या’ तारखेपर्यंत पुण्यातील शाळा कॉलेज बंद राहणार- अजित पवार

UPSC चा सावळा गोंधळ; केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ‘त्या’ पत्रामुळे विद्यार्थ्यांना मोठा फटका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More