वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा मोठा निर्णय!
पुणे | पुणे शहरात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पुणे जिल्ह्यातील शाळा 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांना रुग्णांच्या घरी जाऊन सर्वेक्षण करण्यास सांगितलं आहे.
लग्न समारंभासाठी फक्त 200 लोकांना परवानगी असेल तसेच शहरातील हॉटेल रात्री 11 नंतर बंद करण्यात येणार आहेत. पुण्यात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. तसेच शहरात वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आता संपर्क शोध मोहीम राबवण्यात येणार आहे.
मागच्या एका आठवड्यात कोरोना संक्रमित रुग्णांच्या आकडेवारीत तब्बल एक हजाराची वाढ झाली आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन सतत प्रयत्नशील आहे. आता खासगी क्लिनिकमध्ये येणाऱ्या ताप किंवा सर्दीची लक्षणं असणाऱ्या रुग्णांना RTPCR चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.
थोडक्यात बातम्या-
विना मास्क बुलेट सवारी करणं पडली महागात; नवनीत राणा आणि आमदार रवी राणांवर गुन्हा दाखल
गजानन मारणे प्रकरणाला वेगळं वळण; ‘ती’ लॅंड क्रुझर आणणाऱ्यासह 8 जणांना अटक!
पल्लवी पाटीलचे बोल्ड फोटो सोशल मीडियात व्हायरल!
“खडसेंना दोन महिन्यात तीनवेळा कोरोना झाला, शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केलं पाहिजे”
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; गेल्या 24 तासातील आकडेवारी चिंताजनक
Comments are closed.