शिवसेनेचे लोक सरड्यासारखे रंग बदलतात- अजित पवार

ठाणे | उद्धव ठाकरे कधीच आपल्या भूमिकेवर ठाम राहात नाही. सरडा रंग बदलतो तसे शिवसेनेचे लोक रंग बदलतात, अशी टीका अजित पवार यांनी केली. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यव्यापी दौऱ्यातील दुसऱ्या टप्प्याची सांगता आज ठाणे झाली. त्यावेळी ते बोलत होते. समृद्धी महामार्ग, राष्ट्रपतीपदाची निवडणूक, शेतकरी कर्जमाफीवरील भूमिकांवरुन त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं.

दरम्यान, पक्ष वाढविण्यासाठी जे शक्‍य असेल ते केले. पण त्यातले काही गद्दार निघाले, असंही ते यावेळी म्हणाले. 

थोडक्यात बातम्या मिळवण्यासाठी आमचं फेसबुक पेज आत्ताच लाईक करा…

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या