इतके उपग्रह सोडूनही हवामानाचे अंदाज चुकतात कसे? -अजित पवार

नाशिक | भारताने अवकाशात इतके उपग्रह सोडलेत तरी हवामानाचे अंदाज कसे चुकतात?, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विचारलाय. नाशिकमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

चुकीच्या हवामानाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

दरम्यान, शुक्रवारी माजलगावच्या शेतकऱ्यांनी हवामान विभागाविरोधात तक्रार केली होती. याप्रकरणी चांगला वकील घेऊन या शेतकऱ्यांनी हवामान विभागावर गुन्हा दाखल करावा, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या