राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप; अजित पवार म्हणाले, आजच…
मुंबई | विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात सोशल मीडियात एक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यावरून आज विधानसभेत मोठा गदारोळ झालेला पहायला मिळाला. यावेळी सर्वच भाजप आमदार संतापले होते. भाजप आमदारांनी यावेळी पोस्ट व्हायरल करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्याची मागणी केली, त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्यासंबंधी सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण केल्याचा मुद्दा काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. त्यानंतर, विधानसभेचे वातावरण तापले होते. नाना पटोलेंनी वाचून दाखवलेला उल्लेख कामकाजातून काढून टाकण्यात आला, नंतर देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेपार्ह पोस्टवरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं.
चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने ही पोस्ट लिहिली आहे. आमच्या कार्यकर्त्यांना कशाबाबतही जेलमध्ये टाकलं जातं. पण, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर अद्याप कारवाई केली नाही. मी काय आहे जगाला माहिती आहे, असं म्हणत फडणवीसांनी सरकारला खडेबोल सुनावले. सोबतच पोस्ट व्हायरल करणाऱ्यावर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी विनंतीही केली.
फडणवीसांच्या संतापानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संबधित व्यक्तीवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. सोबतच आजच त्या कार्यकर्त्याला अटक केली जाईल, असंही स्पष्ट केलं.
थोडक्यात बातम्या-
उपसरपंच निवडीवरून वाद, ग्रामपंचायत सदस्याची हत्या
संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर राज्यपालांचा मोठा निर्णय
बेन स्टोक्सला विराट भिडला, भर मैदानात ‘राडा’, पाहा व्हिडिओ
…म्हणून कोरोना प्रवीण दरेकरांच्या जवळ गेला नसेल; अजित पवारांनी पिकवला हशा
‘देशाची संपत्ती विकणं चुकीचं’; सोनिया गांधींचा नरेंद्र मोंदींवर निशाणा
Comments are closed.