चुकीला माफी नाही! वाहतुकीचे नियम मोडल्यानं अजित पवारांनी भरला ‘इतक्या’ हजारांचा दंड
मुंबई | वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास सामान्य नागरिकांकडून दंड आकारण्यात येतो. शहरात कुठेही वाहतूकीचा नियम मोडला की, सर्वसामान्य नागरिकांना ई-चलन दिलं जातं. त्यातच आता राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे दंड भरला आहे.
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अजित पवारांनी 27 हजारांचा दंड भरला आहे. वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे अनेक नेतेमंडळींकडून दंड आकारण्यात येत आहे. मात्र, राज्यातील काही नेतेमंडळींना दंडाची रक्क्म थकबाकी ठेवलेली आहे. अनेक नियोजित कार्यक्रम आणि सभांमुळे नेतेमंडळी वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात.
अजित पवार यांच्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या वाहनावर 14 हजार 200 इतका दंड आहे. तसेच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडून 5 हजार 200 रूपये वाहतूक दंड आकारण्यात आला आहे. राज्यातील अनेक नेतेमंडळींच्या वाहनांवर अनेक प्रकारची चलने प्रलंबित आहे.
दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांनी जर वाहतूक नियम मोडले तर तात्काळ कारवाई करण्यात येते. मात्र, राजकीय लोकांकडून नियमांचे पालन होताना दिसत नाही. नेत्यांच्या गाड्यांचा वेग मोजला जातो का? त्यांना पावत्या देण्यात येतात का?, असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केले जात आहेत.
थोडक्यात बातम्या-
2 मेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
“जोपर्यंत भाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत राज ठाकरे महाराष्ट्राचं कौतूक करणार नाहीत”
“काय शोकांतिका आहे, नवाब मलिक जेलमध्ये बसून मंत्रिमंडळाचा निर्णय घेतात”
सलमान खानच्या ‘या’ चित्रपटातून शहनाज गिल लवकरच करणार बाॅलिवूड पदार्पण
“देवेंद्र फडणवीस येत्या वर्षभरात मुख्यमंत्री होतील”
Comments are closed.