Sharad Pawar 85th Birthday | राज्यातील ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रमुख शरदचंद्र पवार यांचा आज 12 डिसेंबररोजी 85 वा वाढदिवस आहे. आज दिल्लीत त्यांची भेट घेण्यासाठी अनेक नेते पोहोचले आहेत.राजकीय वर्तुळातून अनेक दिग्गजांनी शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे देखील नाव आहे. शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी आपल्या काकांच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट लिहिली आहे. (Sharad Pawar 85th Birthday)
गेल्या दीड वर्षांपासून राजकीय संघर्ष सुरु असलेल्या या काका-पुतण्याच्या नात्याची एक वेगळी बाजू पवारांच्या वाढदिवशी दिसून आली. अजित पवारांनी आपल्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्वीटर) अकाऊंटवरुन पोस्ट करत काका शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
अजित पवार यांची पोस्ट-
“आदरणीय श्री. शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा.”, असं अजित पवारांनी काका शरद पवार यांचा फोटो शेअर करताना म्हटलं आहे. त्यांची ही पोस्ट तूफान व्हायरल झाली आहे. यावर अनेक प्रतिक्रिया देखील नेटकऱ्यांकडून नोंदवल्या जात आहेत.
दीड वर्षांपूर्वी राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये फुट पडली. अजित पवार हे शरद पवारांची साथ सोडत भाजप आणि शिंदे गटात सत्तेत सहभागी झाले. पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार हे अद्याप शरद पवारांसमोर सार्वजनिक मंचावर उपस्थित राहिलेले नाहीत. बऱ्याचदा ते एकाच मंचावर आले असतानाही अजित पवारांनी शरद पवार यांना भेटणे टाळले. अशातच आज काकांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांनी केलेली ही पोस्ट चर्चेत आलीये. (Sharad Pawar 85th Birthday)
आदरणीय श्री. शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा. pic.twitter.com/6SnkF97upb
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 12, 2024
शरद पवार यांचे वैयक्तिक जीवन
दरम्यान, शरद पवार यांचा जन्म हा 12 डिसेंबर 1940 मध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला. कोरेगाव तालुक्यातील नांदवळ हे त्यांचे मुळगाव,शरद पवार यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव पवार आणि आईचे नाव शारदाबाई पवार होते. बारामतीच्या लोकसभा मतदार संघाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या त्यांच्या सुकन्या आहेत. तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, अजित पवार हे त्यांचे पुतणे आहेत.
1967 साली शरद पवार पहिल्यांदा बारामतीमधून आमदार झाले. वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश वयाच्या 29 व्या वर्षी झाला. 1972 आणि 1978 सालच्या निवडणुकीतही ते विजयी झाले.1978 सालच्या निवडणुकीनंतर वसंतदादा पाटील मुखमंत्री झाले. यशवंतराव चव्हाणांबरोबरच वसंतदादा पाटील हेसुद्धा पवारांचे मार्गदर्शक होते. (Sharad Pawar 85th Birthday)
News Title – ajit pawar post on Sharad Pawar 85th Birthday
महत्त्वाच्या बातम्या-
सत्तेची गणितं फिरली तशी सोन्यानेही रंग बदलले; गेल्या 5 वर्षांत ‘असे’ वाढले भाव
कुणाला संधी तर कुणाचा पत्ता कट?, फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराची तारीख ठरली
महालक्ष्मीच्या कृपेने ‘या’ 5 राशींचे येणार सोन्याचे दिवस, सर्व मनोकामना पूर्ण होणार!
सतीश वाघ यांच्या हत्येचं गूढ उकललं, इतक्या लाखांची दिली सुपारी
धक्कादायक! पत्नीच्या छळाला कंटाळून २४ पानांचे पत्र लिहीत AI इंजिनिअरने संपवलं जिवन