मुंबई | महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला आहे. राज्यातील महाविकासआघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. अजित पवार यांनी दुपारी दोन वाजता विधानसभेत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली.
कोरोनाच्या संकटाचं आव्हान देशासमोर आहे, जोडूनिया धन उत्तम व्यवहारे या प्रमाणे काम करावं लागतंय, असं अजित पवार यांनी सांगितलं. तसेच 31 लाख 23 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ झाला, असं अजित पवार यांनी सांगितलं.
पीककर्जावरील व्याजाच्या जाचातून शेतकऱ्यांची सुटका व्हावी म्हणून 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकर्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज दिलं जाणार आहे, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.
दरम्यान, राज्याची आर्थिक स्थिती खालावत असताना ठाकरे सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा मिळतो का? हे पाहावं लागेल.
थोडक्यात बातम्या-
महिलांनी कोणाचंही प्यादं बनून रहायची गरज नाही- राज ठाकरे
नवीन गाडी खरेदी करणाऱ्यांना मिळणार एवढी सूट; नितीन गडकरींनी केली ‘ही’ मोठी घोषणा!
सासू सासऱ्यांनी केलं सूनेचं कन्यादान; बुलडाण्यातील स्तुत्य घटना
अमृता फडणवीसांनी शेअर केला आणखी एक व्हिडिओ; पाहा व्हिडिओ
महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?; अजित पवार ‘हा’ मोठा निर्णय घेण्याची शक्यता
Comments are closed.