मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर करायला सुरूवात केली आहे (Budget 2022). भाषणाच्या सुरूवातीलाच अजित पवारांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
कोरोनामुळे पंचसुत्री अर्थसंकल्पावर भर देणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त संभाजी महाराजांचं स्मारक उभारणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. तर या स्मारकासाठी निधी देखील जाहीर करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांचे पुण्यातील हवेली येथे स्मारक उभारण्यासाठी राज्य सरकारकडून 25 कोटी रूपयांचा निधी देण्यात येत असल्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून हा तिसरा अर्थसंकल्प सादर करण्यात येत आहे. विकासाची पंचसूत्री या कार्यक्रमाअंतर्गत अजित पवार यंदाचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करत आहेत. अर्थसंकल्पात अजित पवार आणखी कोणत्या घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
थोडक्यात बातम्या-
‘राऊत आमच्या तरूण भारतमध्ये येतील पण…’, चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
“फडणवीस असे 10-20 पवार खिशात घालून फिरतात”
मोठी बातमी! राणे पिता-पुत्रांची उच्च न्यायालयात धाव
‘देवेंद्र फडणवीसांचं मिशन महाराष्ट्र’, म्हणाले…
‘मी दु:खी होऊन बसत नाही,मी…’; तेजश्री प्रधानची ‘ती’ पोस्ट व्हायरल
Comments are closed.