बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Budget 2022: तृतीयपंथीयांसाठी अजित पवारांची मोठी घोषणा

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) 2021-22 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प (Budget 2022) आज विधिमंडळात सादर करत आहेत. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अजित पवारांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

कृषि क्षेत्र तसेच अनेक विकासकामांसाठीही अजित पवारांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. कोरोनामुळे पंचसूत्री अर्थसंकल्पावर भर देणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे. यादरम्यान अजित पवारांनी तृतीयपंथीयांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे.

तृतीय पंथीयांना आता स्वतंत्र ओळखपत्र आणि रेशन कार्ड देणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे. तृतीयपंथीयांना आता आधार कार्ड देण्यात येणार असल्याची महत्त्वाची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनचा तिसरा अर्थसंकल्प अजित पवार सादर करत आहे. विकासाच्या पंचसूत्री अंतर्गत अजित पवार अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी आणखी कोणत्या घोषणा करणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

Budget 2022: छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी तब्बल ‘इतक्या’ कोटींचा निधी जाहीर

‘राऊत आमच्या तरूण भारतमध्ये येतील पण…’, चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

“फडणवीस असे 10-20 पवार खिशात घालून फिरतात”

मोठी बातमी! राणे पिता-पुत्रांची उच्च न्यायालयात धाव

‘देवेंद्र फडणवीसांचं मिशन महाराष्ट्र’, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More