…असं छापलं जात असताना राज्याचं शिक्षण खातं झोपा काढत होतं का?

पुणे | छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक मजकूर सर्व शिक्षा अभियानांतर्गतच्या पुस्तकांमध्ये छापला जात असताना राज्याचं शिक्षण खातं झोपा काढत होतं का? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

छत्रपती संभाजी राजा हा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता’ असा वादग्रस्त उल्लेख सर्व शिक्षा अभियानातील ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकात केला गेला असल्याचं समोर आलं आहे. संभाजी ब्रिगेडने या पुस्तकावर आक्षेप घेतला होता.

दरम्यान, राज्यातल्या जनतेची तत्काळ माफी मागा आणि वादग्रस्त मजकूर लिहिलेली पुस्तकं अभ्यासक्रमातून काढून टाका, अशी मागणी अजित पवारांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-…तेव्हा मी असं लिहायला नको होतं; संभाजी महाराजांची बदनामी केल्याप्रकरणी शुभा साठेंनी मागितली माफी!

-फक्त 40 टक्के नव्हे, अख्खं सरकारच बिनकामचं; धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

-‘SHIVDE I AM SORRY’ नंतर पिंपरीत ‘स्मार्ट बायका कुठे जातात? पोस्टरबाजीने खळबळ

-भाजपला सत्तेची मस्ती आली आहे, आता जनताच त्यांची मस्ती उतरवेल- सुप्रिया सुळे

-अजितदादा… आमच्याही पाठीवर हात ठेवून पहा!