“दोघंच अख्ख्या महाराष्ट्राचे मालक झालेत, 165 आमदारांचं पाठबळ तरी… ”
मुंबई | राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे.
सध्या पावसाची आपत्तीजनक स्थिती ओढवली आहे. आपल्याकडे अनेकदा महापूर येतो. पडझड होते. घरं पडतात. तसेच ढगफुटी (Cloudburst) होऊन तलाव फुटतात. याअशावेळी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन संजालक नेमणं गरजेचं आहे. मात्र या सरकारला अजूनतरी पूर्णवेळ सचिव देता आला नाही. हेच या सरकारच अपयश आहे, असं अजित पवार म्हणालेत.
मंत्रीमंडळाचा विस्तार कधी करायचा, हा अधिकार राज्याच्या प्रमुखाचा असतो. सर्व विभागांना मंत्री आणि राज्यमंत्री (Minister of State) नेमले गेले, तर काम लवकर होतं. अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातात. आढावा घेता येतो. मात्र सगळा भार हे दोघंच का घेत आहेत. याचं उत्तर तेच देऊ शकतील. 165 आमदारांचा पांठिबा मिळाला असतानाही अजुन मंत्रीमंडळाचा विस्तार का नाही? घोडं कुठ पेंड खातंय?, असा सवाल अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना केला.
राज्यात जेव्हा संकट येतं तेव्हा पालकमंत्री (Guardian Minister) त्या-त्या जिल्ह्यात जातात. त्यांनी तिथे थांबलं पाहिजे. बऱ्याच जागा खाली आहेत. त्या ताबोडतोब भरून राज्याचा कारभार गतीने होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेची ती गरज आहे. तसच मिडीयाचे सगळीकडे लक्ष असतं त्यामुळे त्यांनी विचार करून वागावं असा सल्लाही त्यांनी शिंदे सरकारला दिला आहे.
थोडक्यात बातम्या
“महाराष्ट्राला 18 तास काम करणारे मुख्यमंत्री मिळाले”
मोठी बातमी! 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित
केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना झटका; ‘या’ वस्तू महागणार
असंसदीय शब्दांची यादी जाहीर; संसदेत जुमलाजीवी, हुकूमशाही शब्द वापरण्यास बंदी
मोठी बातमी! शिंदे सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ निर्णय; वाचा एका क्लिकवर
Comments are closed.