महाराष्ट्र मुंबई

आता मिळालेल्या संधीचं सोनं करा, जय-पराजय विसरून ग्रामविकासासाठी एकत्र या- अजित पवार

मुंबई | राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीतील सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केलं.

आता मिळालेल्या संधीचं सोनं करा, जय-पराजय विसरून ग्रामविकासासाठी एकत्र या, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी दाखविलेल्या विकासाच्या मार्गावर आपल्या गावाला पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावं. जनतेचा विश्वास सार्थ ठरवत ग्रामविकासाचा आदर्श निर्माण करावा, असं अजित पवार निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांना दिलेल्या संदेशात म्हटलं आहे.

गावाचा विकास करण्यासाठी लोकांनी तुमच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे तुमची जबाबदारी आता आणखी वाढली आहे, असं अजित पवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

किमान आतातरी शिवसेनेनं आपली इज्जत आपणच राखावी- देवेंद्र फडणवीस

सेना-भाजपला समान जागा, अपक्षाच्या हाती ग्रामपंचायतीची सत्ता

मला अपघातमुक्त महाराष्ट्र हवा आहे- उद्धव ठाकरे

आईविरोधात वडिलांचं पॅनल उभं करणाऱ्या पिशोरी ग्रामपंचायतीचा पाहा काय लागला निकाल!

पाटोद्यात पेरे पाटील हरले, हिवऱ्यात पोपटराव जिंकले; अण्णांच्या राळेगणमध्ये काय झालं?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या