बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जि.प आणि पंचायत समिती निवडणूक निकालावर अजित पवारांनी व्यक्त केल्या भावना, म्हणाले…

मुंबई | काल राज्यातील 6 जिल्ह्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निवडणुक निकालामध्ये भाजपला वैयक्तिकरित्या चांगलं यश मिळालं. तसेच अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल लागल्याने राजकीय वर्तुळात मात्र चांगलीच खळबळ माजली. या सर्व निकालावर आता खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालाने मी ना आनंदी आहे, ना दु:खी अशा प्रकारच्या भावना अजित पवार यांनी वक्त केल्या आहेत. तसेच येणाऱ्या निवडणुकांमध्ये आणखी मोठं यश मिळवू, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला आहे. महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढलो नव्हतो, असंही त्यांनी यावेळी बोलताना म्हटलं.

वेगवेगळे लढूनही तिन्ही पक्षाचा विचार केला तर ती नक्कीच जास्त मतं जास्त आहेत, असं म्हणत अजित पवारांनी जनतेनं समाधानकारक निकाल दिला असून यावर सावध प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं. तसेच विजयी उमेदवारांचं अभिनंदनही केलं आहे.

‘कोरोना पार्श्वभूमीवर निवडणूक होऊ नये, असं प्रत्येकाला वाटत होतं. कारण, सभांचं आयोजन करता येत नव्हतं, नागरिकांपर्यंत पोहोचणं अवघड झालं होतं. पण तरीही या सर्व वातावरणात ही निवडणूक पार पडली’, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या पार पडलेल्या निवडणुकांबद्दल भाष्य केलं आहे.

थोडक्यात बातम्या

दिलासादायक! कोरोना लसीनंतर आता येणार ‘या’ साथीच्या रोगाची लस

आर्यन खान घरी जाणार की रवानगी पुन्हा कोठडीत होणार? आज होणार निर्णय

महिला ओरडत असतानासुद्धा चालत्या गाडीला रोखून केला अश्लील स्पर्श, निर्लज्ज गुंडांचा व्हिडीओ व्हायरल

देशातील कोरोना रूग्णसंख्या वाढली; पण सक्रिय बाधितांची संख्या मात्र नियंत्रणात?

राज्यभरातील मंदिराचे दरवाजे उघडले पण ‘या’ 6 मंदिरासाठी मात्र कलम 144 लागू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More