Ajit Pawar | लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही. अजित पवार गटाला केवळ 1 जागा मिळाली. हा अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. लोकसभेच्या निकालानंतर आता राज्यात राजकीय भूकंपाची चिन्हं असून पहिला भूकंप हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येण्याची चिन्हं आहेत.
राष्ट्रवादीत मोठा राजकीय भूकंप?
राष्ट्रवादी फुटल्यानंतर 40 हून अधिक आमदार हे अजित पवारांसोबत गेले होते. असं असलं तरी लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना मोठं यश मिळालं. शरद पवारांनी 10 पैकी 8 खासदार हे निवडून आणले. तर दुसरीकडे अजित पवारांचा एकच खासदार निवडून आला.
अजित पवार हे सुनेत्रा पवारांनाही निवडून आणू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांची धाकधूक वाढली आहे. विधानसभेच्या आधी अजितदादांसोबत गेलेले आमदार आता शरद पवारांसोबत येणार असल्याचं बोललं जात आहे.
आमदारांची धाकधूक वाढली
अजित पवारांच्या नाराज आमदारांनी सुप्रिया सुळेंना संदेश पाठवले आहेत. आमदारांनी अभिनंदनपर संदेश करत सुप्रिया सुळेंशी संपर्क साधायचा प्रयत्न केला असल्याची माहिती निकालानंतर समोर आली होती.
दुसरीकडे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी देखील अजित पवारांच्या समर्थक आमदारांबाबत एक मोठं वक्तव्य केलं होतं. सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे काही आमदारांना घेऊन भाजपमध्ये जातील, असा दावा त्यांनी केला होता. तर ज्या आमदारांनी आतापर्यंत शरद पवारांवर टीका केली नाही त्यांच्यासाठी परतीचे दरवाजे उघडे असतील, असंही ते म्हणाले होते.
निकालावर अजित पवार यांनी कोणतीही आपली भूमिका जाहीर न केल्यामुळे त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“एकनाथ शिंदेंवर दबाव होता, तिकीट मिळू नये म्हणून स्क्रिप्ट..”; शिंदे गटाच्या खासदाराचा गौप्यस्फोट
राज्यात जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाने दिली मोठी अपडेट
मोदींच्या सभा फेल!, 18 पैकी 15 उमेदवारांच्या नशिबी आला पराभव
सर्वात मोठी बातमी! निलेश लंकेंच्या पीएवर झाला जीवघेणा हल्ला
निकालानंतर सोन्याचे दर आपटले?; जाणून घ्या नव्या किंमती