मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. यावरुन विरोधी पक्ष नेते अनेक मुंडेंवर अनेक टीका करत आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह कर्नाटक सीमाभागातील सर्व मराठीभाषक गावे महाराष्ट्रात सामील करुन संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करणे, कर्नाटकव्याप्त शेवटचं मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत सर्वशक्तीनिशी, निर्धारानं लढत रहाणं, हीच सीमालढ्यातील हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सीमालढ्यातील हुतात्म्यांचे स्मरण करुन त्यांना अभिवादन केलं होत. याच पार्श्वभूमीवर निलेश राणेंनी अजित पवार यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
ते म्हणाले की, “अजित पवार साहेब जे तुम्हाला जमणार नाही ते बोलू नका. ती गावं महाराष्ट्रात आलीच पाहिजे पण तुम्ही ते करू शकत नाही कारण तुमची राजकीय उंची तेवढी नाही.”
तसंच इतक्या वर्षात त्या गावांना भेट देण्याकरिता कधी गेलात का? अजित पवार सीमाभागात कधी गेले? हेही अजित पवारांनी जाहीर करावं, असंही राणेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
अजित पवार साहेब जे तुम्हाला जमणार नाही ते बोलू नका. ती गावं महाराष्ट्रात आलीच पाहिजे पण तुम्ही ते करू शकत नाही कारण तुमची राजकीय उंची तेवढी नाही. इतक्या वर्षात कधी गेलात काय त्या गावांना भेट देण्याकरिता? जाहीर करावं अजित पवारांनी ते सीमाभागात कधी गेले?https://t.co/1V5f9Sbzh4
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 17, 2021
थोडक्यात बातम्या-
“धनंजय मुंडेबाबत विरोधकांनी राजकारण करु नये”
ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर! कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादीला धक्का
“धनंजय मुंडेंविरोधात बोलशील तर तुझ्या डोक्यात सहा गोळ्या घालेल”
तांडव वेब सीरिजच्या विरोधात लखनौमध्ये FIR दाखल
भास्करराव पेरे पाटलांना मोठा धक्का; पाटोदा ग्रामपंचायतीत सर्वात धक्कादायक निकाल