Top News महाराष्ट्र मुंबई

छत्रपतींच्या जीवन प्रवासावर आधारित ‘शिवसृष्टी’ उभारण्यात येईल; उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई |  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन प्रवासावर आधारित ‘शिवसृष्टी’ थीम पार्क उभारण्यात येईल, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. सदर कामाचा आराखडा उभारण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्याचंही त्यांनी सांगितलं.

याखेरीज महाराजांच्या काळापासून ते सद्यस्थितीतला आधुनिक महाराष्ट्र कशा पध्द्तीनं घडला, याविषयीची माहिती देणारं म्युझिअम उभारलं जाईल, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली आहे. ट्विव करुन यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.

परदेशात उभारल्या जाणाऱ्या टाऊन हॉलच्या धर्तीवर बारामतीतल्या तीन हत्ती चौकाचा विकास करण्याचे निर्देश दिले. याची जबाबदारी प्रसिद्ध वास्तुविशारद पी.के. दास यांच्याकडे सोपवण्यात आली. यासंदर्भातला संपूर्ण आराखडा तयार करण्यास सांगितले. यासह कॅनल सुशोभीकरणाच्या सूचना केल्या, असं अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यापासून अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

मुख्यमंत्र्यांचा मुलगा स्वखर्चाने उभारणार शिवाजी महाराजांचा पुतळा

विद्यार्थिनींनी घेतली प्रेम आणि प्रेम विवाह न करण्याची शपथ; पंकजा मुंडे संतापल्या

महत्वाच्या बातम्या- 

शपथविधी सोहळ्याला केजरीवालाचं पंतप्रधान मोदींना निमंत्रण

“अशी फाटक्या झोळीला ठिगळे लावण्यापेक्षा मोदीजी जरा इकडे बघा…”

‘सविता भाभी…तू इथंच थांब’ होर्डींग्सचं कोडं उलगडलं

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या