बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘येत्या निवडणुकांमध्ये शिवसेनेसोबत युती करणार का?’; अजित पवार म्हणाले…

पुणे | महाविकास आघाडी सरकामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष सत्तेत असताना काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येत्या निवडणुकीमध्ये आपण स्वतंत्र लढणार असल्याचं सांगितलं आहे. यावरून राज्याच्या हितासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीला एकत्र यावं लागेल, असं शिवसेनेनं म्हटलं होतंं. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणुक लढणार असल्याच्या चर्चांणा उधाण आलं आहे.

अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिवसेनेसोबत एकत्र लढणार का असा सवाल करण्यात आला. यावर ज्यावेळी निवडणुका जाहीर होतील तेव्हा कोणाकोणाची आघाडी आणि कोणाची युती हे पत्रकार परिषद घेऊन व्यवस्थित सांगतो. आता तसलं काही डोक्यात नाही, असं अजित पवार म्हणाले. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याची मुभा आहे. किमान समान कार्यक्रमाच्या माध्यमातून जी जबाबदारी स्वीकारली आहे ती व्यवस्थित पार पाडण्याचं काम सुरु असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना अजित पवारांनी शिवसेनेला  वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, येत्या काळात काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणुका लढवाव्यात अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे. 2024 मधी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष मोठा पक्ष म्हणून सत्तेत येईल, असं नाना पटोले यांनी म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या- 

“बारामतीकरांनो, पवार घराण्याच्या गुलामगिरीतून मुक्त व्हा”

मिल्खा सिंग यांची भूमिका साकारणारा अभिनेता फरहान अख्तर म्हणाला….

देशातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या 60 हजारात, मृतांचा आकडाही घटला

पप्पा म्हणाले “केसांचा कोंबडा छान दिसतोय”, पाहा प्राजक्ता माळीची वेगळीच हेअरस्टाईल

सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण; वाचा आजचे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More