बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पूरग्रस्तांच्या आर्थिक पॅकेजबाबत अजित पवार म्हणाले…

कोल्हापूर | गेल्या काही दिवसांपासुन महाराष्ट्रातील विविध भागांंमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली असून पावसामुळे जीवीत तसेच वित्तहाणी झाली आहे. त्यातच पुरग्रस्तांसाठी सरकार कधी मदत जाहीर करणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज कोल्हापूर दौऱ्यावर होते.

आज कोल्हापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असताना अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पुरग्रस्तांसाठी पॅकेज कधी जाहीर करणार? असा प्रश्न अजित पवारांना विचारला असता त्यासाठी संपुर्ण नुकसानीचं चित्र स्पष्ट होणं गरजेचं आहे, असं म्हणत त्यानंतरच पॅकेजबद्दल निर्णय घेतला जाऊ शकतोे, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

आता लोकप्रियतेसाठी घोषणा करणार नसुन येणाऱ्या 2 दिवसात अहवाल आल्यास मदत केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी यापुर्वी बोलुन दाखवलं होतं. कोकणातील तळिये गावात दरड कोसळुन झालेल्या दुर्घटनेत अनेकांना आपला जिव गमवावा लागला आहे. त्यातच अजित पवारांच्या वक्तव्यामुळे नुकसानग्रस्त नागरिकांना पॅकेजसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागु शकते.

पावसाने कोकण व पश्चिम महाराष्ट्राला चांगलंच झो़डपुन काढलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संबंधी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच नागरिकांना आधारदेखील दिला आहे. पुरामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचं नुकसान झालं आहे. तर आता या नुकसानग्रस्त भागाला पॅकेज कधी जाहीर होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या

“भाजप आमदाराला सोबत घेऊन राज्यपालांनी शासकीय दौरा करणं हे कितपत योग्य?”

पुरग्रस्तांसाठी राष्ट्रवादी सरसावली पुढे; तब्बल 2.5 कोटींची मदत जाहीर

आर्थिक संकटांमुळे मोदी सरकार अतिरिक्त नोटा छापणार?; निर्मला सितारामन म्हणतात…

राज कुंद्रा प्रकरणात नवा ट्विस्ट; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचं नाव आलं समोर

राज्यात पुन्हा पावसाचं संकट; महाराष्ट्रातील ‘या’ सहा जिल्ह्यांना अलर्ट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More