बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“CM फंडसाठी निधी द्या, वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी गर्दी नको”

मुंबई  | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. मात्र, कोरोनाचा दिवसेंदिवस वाढत जाणारा धोका लक्षात घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत:चा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी आपले कार्यकर्ते आणि हितचिंतकांना महत्वाचं आवाहन केलं आहे.

माझ्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे जाहीर कार्यक्रम आयोजित करु नयेत. दुरध्वनीवरुन किंवा डिजीटल स्वरुपात शुभेच्छा व्यक्त कराव्यात. नागरिकांनी प्रत्यक्ष भेटायला येणे टाळावे तसेच गर्दी जमवू नये. नियमांचंं पालन करुन सर्वांनी महाराष्ट्राला कोरोनामुक्त करण्याच्या लढाईत योगदान द्यावे, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

तसेच कार्यक्रमासाठी खर्च होणारा निधी मुख्यमंत्री सहायता निधीसारख्या कोविडविरोधी लढ्यासाठी द्या. कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करुन रक्तदान शिबिरांसारखे लोकोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करा, असं देखील आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

दरम्यान, अजित पवारांची कामाची शैली प्रत्येकाला परिचित आहे. त्यांचा या अंदाजामुळे कित्येक कार्यकर्ते त्यांना मानतात आणि अजित पवारांसाठी जीव ओवाळून टाकण्याचीही तयारी ठेवतात. असाच जळगावमध्ये त्यांचा कार्यकर्ता आहे. जळगावमधील अरविंद चितोडिया याने अजित पवारांच्या 22 जुलैला असलेल्या वाढदिवसानिमित्त 30 क्विंटल साखरेचं वाटप केलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

येत्या निवडणूकीमध्ये एखादा उमेदवार निवडणून नाही आला तरी चालेल, पण…, – देवेंद्र फडणवीस

मला वाटतं यापेक्षा दुसरा मोठा जोक असु शकत नाही- अमोल मिटकरी

“ठाकरे सरकारमध्ये नेते कमी आणि बोलके पोपट जास्त आहेत”

“केवळ याच जन्मात नाही तर पुढील जन्मातही पंकजा मुंडे भाजपमध्येच राहतील”

‘…म्हणून गेले दोन-तीन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले नाहीत’; रोहीत पवारांनी सांगितलं कारण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More