ईव्हीएमबाबत शंका नाही; अजित पवारांचा शरद पवारांना घरचा आहेर

पुणे |  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुुप्रिया सुळे यांनी ईव्हीएमविषयी शंका उपस्थित केली आहे. मात्र राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी याबाबत वेगळं मत व्यक्त केलं आहे.

ईव्हीएमबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही, असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवार यांना घरचा आहेर दिला आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

एकाच पक्षातील आघाडीच्या नेत्यांमध्ये ईव्हीएमबाबत वेगवेगळी मतं असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा वाढू लागल्या आहेत.

दरम्यान, घड्याळ्याचं बटण दाबल्यास मत कमळाला गेल्याचं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं.

महत्वाच्या बातम्या

-राहुल गांधींमुळे सलूनवाल्याची उधारी झाली बंंद!

-पोस्टर बॉईज; धोनीच्या कट्टर समर्थकांचा मुंबई इंडियन्समध्ये जाहीर प्रवेश!

-रोहित शर्मा माझी बायको आहे का, त्याला नेहमी नेहमी बोलायला- शिखर धवन

-…म्हणून बंगालमध्ये माझ्या रॅलीवर हल्ला करण्यात आला- अमित शहा

-सुप्रिया सुळेंविषयी आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या तरुणाला कार्यकर्त्यांचा चोप