तुम्ही भांडत बसा, समृद्धी महामार्गाचं नावही आम्हीच ठेऊ!

संग्रहीत फोटो

बारामती | सध्या महाराष्ट्रात समृद्धी महामार्गाच्या नावावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात राजकारण तापत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी समृद्धी महामार्गाबाबत सुचक वक्तव्य केलं आहे. 

समृद्धी महामार्ग होण्यासाठी अजून 4-5 वर्ष आहेत. त्यावरून ते आतापासूनच भांडत बसलेत, अशी टीका अजित पवारांनी केली.

पुणे-मुंबई एक्सप्रेस सुरु केला. उर्वरित काम आम्ही पुर्ण केलं. त्याला यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग नाव देऊनही टाकलं, अशी आठवण त्यांनी करून दिली. समृद्धी महामार्गाचं नावही आम्हीच ठेवणार, तुम्ही भांडत बसा, अशी कोपरखळी मारली.

दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावरून 2019 मध्ये राष्ट्रवादीच सत्ता स्थापन करंल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-विनोद तावडेच म्हणतात शिक्षक-प्राध्यापक चोर; अजित पवारांचा गौप्यस्फोट

-युवराज सिंग आणि गौतम गंभीरला मोठा झटका; IPL संघांमधून हकालपट्टी

-नेते आणि अधिकाऱ्यांची मुलं सैन्यात का नाहीत; शहीद गोसावींच्या मामांचा सवाल

-आणखी एका शेतकरी महिलेनं स्वतःचं सरण रचून आयुष्य संपवलं

-झोपडपट्टीतील लोक सोबत असतात, तेव्हा जिंकण्याची खात्री असते!