विनोद तावडेच म्हणतात शिक्षक-प्राध्यापक चोर; अजित पवारांचा गौप्यस्फोट

बारामती | शिक्षक- प्राध्यापक चोर आणि संस्थाचालक दरोडेखोर आहेत, असं शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणतात, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला आहे. ते बारामतीत एका बोलत होते. 

शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यात सरकार चालढकल करत असल्याचं सांगताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

काही शिक्षण संस्थांनी शिक्षणाचे बाजारीकरण केलं तर काही चुकीच्या वागल्या असतील. त्यामुळे ज्या संस्था चुकीच्या वागतात त्यांच्यावर आक्षेप घ्या. मात्र ज्या संस्था आपलं काम योग्यपणे करत असतील त्यांच्या अडचणी दूर करा, असं त्यांनी यावेळी सांगितलं. 

दरम्यान, विनोद तावडेंनी आपल्याकडे अनेकदा खासगीत शिक्षक-प्राध्यापक चोर आणि संस्थाचालक दरोडेखोर असतात असं म्हटलं आहे, असा खुलासाही त्यांनी यावेळी केला.

महत्त्वाच्या बातम्या-

-युवराज सिंग आणि गौतम गंभीरला मोठा झटका; IPL संघांमधून हकालपट्टी

-नेते आणि अधिकाऱ्यांची मुलं सैन्यात का नाहीत; शहीद गोसावींच्या मामांचा सवाल

-आणखी एका शेतकरी महिलेनं स्वतःचं सरण रचून आयुष्य संपवलं

-झोपडपट्टीतील लोक सोबत असतात, तेव्हा जिंकण्याची खात्री असते!

-सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांवर भडकले रामदास आठवले