बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आम्हा बारामतीकरांना भल्या सकाळी काम सुरू करायची सवय लागलीये- अजित पवार

पुणे | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची आज सकाळी बारामती दौऱ्याला सुरूवात झाली आहे. बारामती नगरपरिषदेच्या कमर्शियल कॉम्प्लेक्सचं भूमिपूजन करण्यात आलं. तसेच नव्याने बांधण्यात येत असलेल्या व्यावसायिक संकुलाच्या माहितीचा आढावा घेतला. कामाच्या दर्जाबाबत त्यांनी ठेकेदारांना सुचनाही केल्या. यावेळी त्यांच्याहस्ते सहारा फाउंडेशनच्या मार्फत शिलाई मशिनचं वाटप करण्यात आलं.

आम्हा बारामतीकरांना भल्या सकाळी सकाळी काम सुरू करायची सवय लागली आहे. ही सवय पवार साहेबांमुळे लागली आहे. या सवयीमुळे अनेक लोक दबगतात की हा बाबा कधी येईल याची काही शाश्वती नाही. माझा मुद्दाम कोणाला त्रास द्यायचा हेतू नसतो. सकाळी लवकर काम सुरू केलं की इतर गोष्टींना वेळ देता येतो, असं अजित पवार म्हणाले.

राज्यात कोरोनाचं संकट आहे. कोरोनामुळे विकासकामात अडथळा येत आहे तरी, या कठीण काळात विकासकामे सुरू आहेत. बारामतीकरांच्या प्रेम, आशीर्वादामुळेच हे सर्व होत आहे. सच्चर समितीच्या अहवालात काही गोष्टी आल्या असल्या तरी यातून आपण मार्ग काढू. मात्र, तीन भीन्न विचारांचे पक्ष एकत्र आल्यामुळे काही बाबी सबुरीनं घ्यावा लागतात, असं अजित पवार म्हणालेत.

आम्ही बारामतीकरांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहोत. महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय पवार साहेबांनीच घेतला. कोरोना काळात अनेक नागरिकांचे रोजगार गेले आहेत. राज्य सरकारचं उत्पन्न सव्वा तीन कोटीवर आलं आहे, जे आधी साडेचार कोटी होतं. काही झालं तरी आम्हाला पगार द्यावेच लागतात. कोरोना अद्याप संपला नाही, त्यामुळे सर्वांनी नियम पाळा, मास्क वापरा, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

येत्या 24 तासांत राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता!

काळीज पिळवटून टाकणारा अपघात; वाढदिवसाच्या दिवशी ओढावलं मरण

“मिटकरींना तोंडाच्या गटारावर आमदारकी मिळाली, त्यांनी हे गटर बंद ठेवावं, अन्यथा….”

“भाजपची सध्याची अवस्था म्हणजे मी नाय त्यातली कडी लाव आतली”

“दीडदमडीच्या लोकांनी बोलू नये, त्यांची तेवढी लायकी नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More