मुंबई | अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात. मात्र कधी-कधी असे मजामस्तीचे क्षणही पाहायला मिळतात.
आज सभागृहात कांद्याचे दर आणि कापसाच्या दरावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. मात्र याच मुद्द्यावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप नेते गिरीज महाजन (Girish Mahajan) यांना खोचक टोला लगावला.
अजित पवार सभागृहात बोलत असताना ते कांद्याचा प्रश्न, सरकारने जाहिरातबाजीवर केलेला खर्च अशा अनेक मुद्द्यावरून सरकावर टीका करत होते. यावेळी ते बोलत असताना भाजप नेते गिरीश महाजन यांनी अजित पवार यांना रोखण्याचा प्रयत्न केला.
अजित पवार यांच्या पाठिमागे बसलेल्या धनंजय मुंडे यांनी महाजन यांना अंकल अंकल म्हणत चिडवलं. हे ऐकून अजित पवारही आपल्या भाषणात म्हणाले, अंकल अंकल काकीला सांगीन. मग किती काकी आहेत ते बघावं लागेल, असं म्हणताच सभागृहात मोठा हशा पिकला.
महत्त्वाच्या बातम्या-