Ajit Pawar-Sharad Pawar | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज 12 डिसेंबररोजी राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांची दिल्ली येथे भेट घेतली. अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल देखील उपस्थित आहेत. या सर्वांनी आज दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं आहे. (Ajit Pawar-Sharad Pawar )
महायुती सरकारचा अद्याप मंत्रीमंडळ विस्तार होणे बाकी आहे. येत्या 14 डिसेंबररोजी मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली?, ही भेट कशासाठी होती?, याबद्दल आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
अजित पवार-शरद पवारांच्या भेटीमुळे चर्चेला उधाण
आज शरद पवार यांचा 85 वा वाढदिवस आहे. आज दिल्लीत त्यांची भेट घेण्यासाठी अनेक नेते पोहोचले आहेत. राजकीय वर्तुळातून अनेक दिग्गजांनी शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. अशात स्वतः अजित पवार देखील सहकुटुंब दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शरद पवार यांना वाढदिवशी शुभेच्छा दिल्या. ही भेट फक्त वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी होती, असं म्हटलं जातंय. (Ajit Pawar-Sharad Pawar )
मात्र, पक्षफूटीनंतर सहकुटुंब अशी अचानक भेट घेतल्याने अजित पवार आणि शरद पवार हे चर्चेत आले आहेत. ही नव्या राजकीय समिकरणांची नांदी तर नाही?, असं राजकीय वर्तुळात बोललं जातंय. अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी दोन्ही नेते एकत्र दिसले हे आनंददायी चित्र असल्याची प्रतिक्रिया दिली.
अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया-
अजित पवार यांनी स्वतः देखील या भेटीवर प्रतिक्रिया दिली. आम्ही इन जनरल विषयांवर चर्चा केली. चहा, पाणी, नाश्ता केला आणि निघालो, असं अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले. परभणीला काय घडलं याबरोबर इतर महत्त्वाच्या घडामोडींवरही आम्ही बोललो. इन जनरल चर्चा झाली. लोकसभा, राज्यसभा का कमी चालली? मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, अधिवेशन केव्हा आहे, यावरही चर्चा केली असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.
आजचा दिवस साहेबांचा वाढदिवस आहे. 12 डिसेंबरला सर्वजण भेटत असतात. साहेबांचे दर्शन घेतात. शुभेच्छा देतात. आम्हीही त्यासाठी आलो होतो, असेही अजित पवारांनी म्हटले. दरम्यान, आज सकाळीच अजित पवार यांनी शरद पवारांच्या वाढदिवशी सोशल मीडियावर एक पोस्ट देखील केली होती. “आदरणीय श्री. शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा.”, असं अजित पवारांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं. (Ajit Pawar-Sharad Pawar )
News Title – Ajit Pawar-Sharad Pawar meeting in Delhi
महत्त्वाच्या बातम्या-
सर्वात मोठी बातमी! अजित पवार शरद पवारांच्या भेटीला, दिल्लीत मोठी खलबतं?
काका शरद पवारांना अजितदादांकडून वाढदिवशी खास शुभेच्छा; म्हणाले…
सत्तेची गणितं फिरली तशी सोन्यानेही रंग बदलले; गेल्या 5 वर्षांत ‘असे’ वाढले भाव
कुणाला संधी तर कुणाचा पत्ता कट?, फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराची तारीख ठरली
महालक्ष्मीच्या कृपेने ‘या’ 5 राशींचे येणार सोन्याचे दिवस, सर्व मनोकामना पूर्ण होणार!