अजित पवारांकडून पंतप्रधान मोदींवर कौतुकाचा वर्षाव, म्हणाले…
पुणे | राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी नरेंद्र मोदींचं कौतुक केल्याचं पहायला मिळालं.
नरेंद्र मोदी 6 मार्च रोजी पुणे दौऱ्यावर येणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. मोदींविषयी बोलताना अजित पवार म्हणाले की, पंतप्रधान मोदी जेव्हा सत्तेत आले तेव्हा त्यांनी विकासकामांच्या माध्यमातून लोकांची मनं जिंकली.
अजित पवार पुढे म्हणाले, जे लोकं विकासाबद्दल बोलतात त्यांनाच जनता संधी देते. वादांमध्ये रस असणारे फार थोडे लोक आहेत.
दरम्यान, पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा मानसन्मान ठेवला गेला पाहिजे. पंतप्रधान देशाच्या कोणत्याही भागात जाऊ शकतात, तो त्यांचा अधिकार आहे. लोकशाही पद्धतीने निवडून मोदी पंतप्रधान झाले आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर आल्यानंतर त्यांच्या कार्यक्रमामध्ये पालकमंत्री म्हणून सहभागी होणार, असंही अजित पवार यांनी म्हटलं.
थोडक्यात बातम्या –
नवाब मलिकांच्या अडचणींत वाढ! रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच…
“मोदींनी तात्काळ राज्यपालांची उचलबांगडी करावी, अन्यथा….”
…म्हणून उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी संभाजीराजे भावूक, डोळ्यात अश्रू तरळले
तळीरामांचाही युक्रेनला पाठिंबा; चक्क गटारीत ओतला रशियन व्होडका, पाहा व्हिडीओ
‘नवाब मलिक चांगला माणूस, त्यांना अटक व्हायला नको होती’; केंद्रीय मंत्र्यांचं वक्तव्य
Comments are closed.