बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘हे कृत्य राक्षसी’; पुण्यातील घटनेवर अजित पवार संतापले

पुणे | मैदानात खेळत असताना एका अल्पवयीन मुलीची अमानुष हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील घडली आहे. मैदानात कबड्डी खेळत असलेल्या 14 वर्षीय मुलीवर कोयत्याने वार करत तिची हत्या करण्यात आली. बिबवेवाडी परिसरात घडलेल्या या संतापजनक घटनेनंतर पुणे शहर हादरलं आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी देखील या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.

ही घटना अत्यंत निंदनीय आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण आहे. ही समाजविघातक मानसिकता संपवण्यासाठी गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली असल्याची संतप्त टीका अजित पवार यांनी केली आहे.

अल्पवयीन मुलीवर इतक्या अमानुषपणे वार करणारा व्यक्ती माणुस असुच शकत नाही, हे कृत्य राक्षसी आहे. अशा वृत्ती वेळीच ठेचुन काढल्या पाहिजेत, अशी तीव्र प्रतिक्रीया अजित पवारांनी दिली. ते पुढे बोलताना म्हणाले की, कबड्डीपटू होण्याची स्वप्न पाहणाऱ्या या मुलीच्या हत्येने सर्वांची मान शरमेने खाली गेली आहे. यापुढे कुठल्याही मुलीवर अशी वेळ न येऊ देणं हीच खरी श्रद्धांजली ठरेल.

तर आरोपीला पकडून कठोर शासन करण्यात येईल, असा विश्वासही अजित पवारांनी व्यक्त केला आहे. बिबवेवाडीतील यश लॉन्सवर ही दुर्दैवी घटना घडली. एकतर्फी प्रेमातून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी आरोपी आणि त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असुन पोलिस पुढचा तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

“दसऱ्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला सुरूवात; आम्ही पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवणार”

…अन् भाजप उमेदवाराला पडलं फक्त ‘1 मत’; खुद्द परिवाराने फिरवली पाठ

”जवा गातीस तू एक गाणं, मला अजून मुख्यमंत्रीच असल्यासारखं वाटतंय”

आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची जय्यत तयारी! शरद पवारांच्या उपस्थितीत प्रमुख नेत्यांची बैठक

बिअर पिणाऱ्यांनो सावधान, अत्यंत धक्कादायक माहिती आली समोर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More