बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘राज्यपालांनी आता अंत पाहू नये’; अजित पवार संतापले

पुणे | राज्यपालांनी आता अंत पाहू नये. त्यांना भेटून नियुक्त्या का रखडल्या हे विचारावं लागेल, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

राज्यपालांना 12 नावं दिली आहेत. सर्व नियम आणि अटी पाळून ही नावं दिली आहेत. कॅबिनेटमध्ये ठराव करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या सहीचं पत्रंही देण्यात आलं. आम्हाला पूर्ण बहुमत आहे. सभागृहातही 171 आमदारांचं बहुमत सिद्ध करण्यात आलं आहे. त्यामुळे या नावावर राज्यपालांनी निर्णय घ्यावा, राज्यपालांनी अंत पाहू नये, असं अजित पवार म्हणाले.

राज्यपाल नियुक्त सदस्यासाठी ज्या गोष्टी करायला हव्यात त्या सर्व करण्यात आल्या आहेत. एवढं सर्व झालेलं असताना ज्यांची अंतिम सही व्हायला हवी तेच सही करत नाहीत, असं अजित पवारांनी सांगितलं.

कधी तरी वेळ काढून राज्यपालांना भेटावं लागेल. सही का करत नाहीत हे विचारावं लागेल, असं अजित पवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

‘सोबत चालायचं असेल तर काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद द्यायला पाहिजे’; काँग्रसेच्या ‘या’ बड्या नेत्यानी केली मागणी

रिहानाचा ख्रिस गेलसोबतचा ड्रेसिंगरूममधील व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ

…म्हणून राष्ट्रवादीच्या पदवीधर अध्यक्षाने थेट कॅनडाच्या पंतप्रधानांनाच लिहिलं पत्र

कृषी कायद्यात काय कमतरता हे शेतकरी नेत्यांना सांगता आलं नाही- नरेंद्रसिंह तोमर

“आंदोलनाच्या ठिकाणी खिळे ठोकणं?, हे केंद्र सरकारला शोभत का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More