बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“विरोधी पक्षाचे नेते येतात आणि टीका करतात, पण त्यांचं सरकार होतं तेव्हा त्यांनी काय दिलं?”

पंढरपूर | विरोधी पक्षाचे नेते येतात आणि टीका करतात. पण तुमचं सरकार होतं तेव्हा तुम्ही काय दिलं? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार गुरूवारी पुन्हा एकदा पंढरपुरात आले होते. यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की चांद्यापासून बांद्यापर्यंत विकास करु, पण कोरोनाचं संकट आलं. खरं तर ही निवडणूक व्हायला नको होती. पण भाजपने आडमुठेपणाची भूमिका घेत निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही, असं सांगत अजित पवारांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

राज्यातील साखर कारखान्यांचे प्रश्न महाविकास आघाडीच सोडवू शकते. पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील कारखाने मी स्वत: संचालक म्हणून निवडून देणार, असा दावाही अजित पवार यांनी केला यावेळी केलाय.

कोरोनाच्या लाटेत सर्वाधिक नुकसान पंढरपूर तालुक्याचं झालं. अनेक नेते सोडून गेले. आता तुम्ही महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून द्या, डबल निधी देतो, असं आश्वासनही अजित पवारांनी आपल्या भाषणात दिलंय. तसेच राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना विजयी करण्याचं आवाहन पंढरपुरातील मतदारांना केलंय.

थोडक्यात बातम्या- 

मोठी बातमी! मुंबईच्या हाफकिन संस्थेत लसनिर्मिती होणार, केंद्र सरकारने दिली परवानगी

आज पुण्यात कोरोनाचे किती रुग्ण आढळले?; सर्व आकडेवारी एका क्लिकवर…

बच्चु कडुंची संकल्पना ऐतिहासिकच नाही, तर शेतकऱ्यांना समृद्धी देणारी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुलीवर बलात्कार… बापानं असा घेतला बदला की काळजाचा थरकाप उडेल

महिन्याभरात कोरोना काय रुप घेईल?; नितीन गडकरींचा जनतेला मोठा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More