बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आपण कुणाच्या भानगडीत पडत नसतो, आपला नाद करायचा नाय”

पंढरपूर | आपण कोणाच्या भानगडीत नसतो आणि आपला नाद कोणी करायचा नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. पंढरपूर येथील शिवाजी चौकात राष्ट्रवादी उमेदवार भागीरथ भालके यांच्या प्रचाराची सभा घेण्यात आली. यावेळी अजित पवार बोलत होते. यावेळी अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलेल्या टीकेला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज्यातील आघाडी सरकार पाडणारा अजून जन्माला यायचा आहे. सरकार पाडणं कोणा येड्या गबाळ्याचं काम नाही, अशी बोचरी टीका अजित पवारांनी फडणवीसांवर केली आहे.

राजकारणात कोणी कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. तसेच राज्यातील आघाडी सरकार पाडणं म्हणजे काय खेळ वाटतो काय? हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय, अशा शब्दात अजित पवारांनी  देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलं आहे.

अजित पवार यांनी आज चंद्रकांत पाटील यांचा उल्लेखही ‘चंपा’ असा करत ते उद्या येथे येऊन काहीही सांगतील पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, असं म्हणत अजित पवारांनी यावेळी चंद्रकांत पाटील यांच्यावरही जरोदार टीकास्त्र सोडलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

उस्मानाबादेत एकाशेजारी एक 19 चिता पेटल्या, जागा कमी पडल्यानं 8 अंत्यसंस्कार उद्या

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात गारपिटीमुळे गारांचा खच, विश्वास बसणार नाही असा व्हिडीओ-

संचारबंदीमुळे परप्रांतीय मजूर परतीच्या वाटेवर; बसस्थानक, रेल्वे स्टेशनवर तुफान गर्दी

जाणुन घ्या पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी

संचारबंदीकाळात महाराष्ट्रात दारू मिळणार की नाही?

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More