Top News

स्वतःचं अपयश लपवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी ‘ते’ वक्तव्य केलं- अजित पवार

मुंबई | केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. त्याचं समर्थन करता येत नाही, त्यामुळे कर कमी करण्याची मागणी राज्य सरकारकडे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

स्वतःचं अपयश लपवण्यासाठी फडणवीसांनी असं वक्तव्य केलं असणार, असं टोला अजित पवारांनी फडणवीसांना लगावला आहे.

पेट्रोल-डिझेलची दरवाढ कुणाच्या हातात असते, हे आपल्या देशातील लोकांना माहीत आहे. उलट केंद्र सरकारच्या अशा दरवाढीमुळे उद्या पेट्रोल 100 रुपये लीटर झालं, तरी आश्चर्य वाटून घेऊ नये, असं अजित पवार म्हणाले.

शिवसेनेनं पेट्रोल-डिझेलवर मोर्चे काढण्याची नौटंकी करु नये. राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरचे टॅक्सेस कमी करावेत आणि भाववाढ नियंत्रणात आणावी, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

नवरा दलित आहे म्हणून आई-वडिलांनी गरोदर मुलीसोबतच केलं हे धक्कादायक कृत्य

वसुलीसेना?; मुख्यमंत्र्यांचा फोटो छापून फेरीवाल्यांकडून फाडल्या जातायेत पावत्या

अमित शहांचे पूत्र कुठल्या आधारावर BCCI चे सचिव झाले?; मोदींचा सवाल

उपमुख्यमंत्री बदलण्याचा प्रस्ताव?; अजित पवार म्हणतात…

“हे जय शहा… BCCI सोबत करारबद्ध असलेल्या क्रिकेटपटूंच्या अकाउंंटवरुन ट्विट करु नका”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या