महाराष्ट्र मुंबई

प्रमुख पक्षाचं तिकीट घेऊनही पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त होतंय, अन् तुम्ही मला…- अजित पवार

File Photo

मुंबई | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जेजुरी इथल्या अहिल्यामाई होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. मात्र या पुतळ्याचं अनावरण उद्या 13 फेब्रुवारीला शरद पवार यांच्या हस्ते नियोजित होतं. मात्र त्यापूर्वीच पडळकरांनी हे अनावरण केलं. त्याचवेळी बोलताना पडळकरांनी शरद पवार आणि पवार कुटुंबियांवर टीका केली. याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं.

ज्यांचं डिपॉझिट वाचत नाही त्याची काय एवढी नोंद घेता तुम्ही? उभा राहिल्यानंतर जनतेचा पाठिंबा आहे का? प्रमुख पक्षाचं तिकीट घेऊन पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त होतं. आणि तुम्ही मला प्रेस कॉन्फरन्मध्ये प्रश्न विचारताय, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.

अहो त्यांची टीका म्हणजे विनाशकाली विपरीतबुद्धी सुचलीय. त्यांचं डिपॉझिट कुणी ठेवत नाही, त्यांचं काय एवढी नोंद घेताय तुम्ही, असं अजित पवार यांनी म्हटलंय.

दरम्यान, अहिल्यादेवींचं काम अखंड हिंदुस्तानात आहे. इतिहासात नोंद घेणारं त्यांचं काम आहे. त्यांचं मंदिराच्याबाबत जिर्णोद्धार असो, प्रजाहितकारी म्हणून त्यांची जगभर कीर्ती आहे. अशा व्यक्तिमत्त्वाच्या पुतळ्याचं अनावरण हे चारित्र्यसंपन्न, निष्कलंक माणसाच्या हातून व्हायला हवं ही आमची इच्छा होती. परंतु ज्यांच्या हस्ते उद्घाटन ठेवलं होतं, ते शरद पवारांचं वागणं, विचार हे अहिल्यादेवींच्या उलट आहे. त्यामुळे आम्ही युवा मित्रांनी मेंढपाळ्यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण पहाटे केलं, असं पडळकर म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

‘दरवाजा तोड, मोबाईल ताब्यात घे’; पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील ऑडिओ क्लिप व्हायरल

मुख्यमंत्री महोदय, सर्व पुरावे असतांना वाट कसली पाहताय- चित्रा वाघ

“राज्यपालांनीसुद्धा नियमाप्रमाणे काम केलं पाहीजे, एका हाताने टाळी वाजत नाही”

देवेंद्र फडणवीसांच्या ‘निवडून येणार’ला अजित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

मोदीजी, पृथ्वीराज चौहान यांनी केेलेली ‘ती’ चूक तुम्ही करू नका- कंगणा राणावत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या