महाराष्ट्र मुंबई

रावसाहेब दानवेंच्या त्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले…

मुंबई | दिल्लीमध्ये सुरु असलेलं आंदोलन देशातील शेतकऱ्यांचे नाही. हे एक षडयंत्र आहे. या आंदोलनाच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तान या देशांचा हात आहे, असं वक्तव्य भाजप नेते रावसाहेब दानवेंनी केलं. त्यांच्या या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार समाचार घेतला आहे.

रावसाहेब दानवे यांचं हे वक्तव्य तथ्यहीन आहे, असं म्हणत अजित पवार यांनी रावसाहेब दानवेंवर निशाणा साधला आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

शेतकरी आंदोलन करत असताना असं बोलायला नको होतं. पण ते मी असं बोललोचं नाही असं स्पष्टीकरण नंतर ते देतील, असा टोलाही अजित पवार यांनी दानवेंना लगावला आहे.

दरम्यान, दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना अजित पवार यांनी केंद्र सरकारनं हटवादीपणा सोडायला हवा, असं म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

‘सोनू सूद नंबर 1’; आशियातील 50 सेलिब्रिटींमध्ये सोनू टॉप

“शक्ती कायदा सर्वांसाठीच एकसमान न्याय देईल, मग ते तरुण कॅबीनेटमंत्री असले तरी”

भाजपच्या माजी प्रदेशाध्यक्षांच्या वादग्रस्त वक्तव्यावर आजी प्रदेशाध्यक्षांचं स्पष्टीकरण; चंद्रकांत पाटील म्हणाले…

कोरोना लस घेतल्यानंतर मद्यपान करता येणार नाही; नियमावली जाहीर

अरारारारा… खतरनाकssss पुन्हा होणे नाही, माझा हक्काचा संगीतकार गेला- प्रविण तरडे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या