…तेव्हा तर काही केलं नाही, आता ढुसण्या मारणं बंद करा- अजित पवार
औरंगाबाद | भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख आणि काँग्रेस आमदार धिरज देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली होती. यावरून अजित पवारांनी संभाजी पाटील निलंगेकर यांना टोला लगावला आहे.
संभाजी पाटील निलंगेकर मागे मंत्री होते. त्यांचं सरकार राज्यात आणि केंद्रातही होतं. तेव्हा काही केलं नाही आणि आता ढुसण्या मारत आहेत. हे धंदे बंद करा, असं म्हणत अजित पवारांनी संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी गेल्या विधानसभेला प्रचंड मोठी फिक्सिंग झाल्याचा मोठा गौप्यस्फोट काही दिवसांपूर्वी केला होता.
अमित देशमुख यांचे धाकटे बंधू धीरज देशमुख, देवेंद्र फडणवीस यांचे पीए अभिमन्यू पवार, तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे या तिघांना निवडून आणण्यासाठी तीन पक्षांचे राजकीय फिक्सिंग झाल्याचा अप्रत्यक्ष आरोप निलंगेकरांनी केला होता.
थोडक्यात बातम्या-
‘पूजा चव्हणाची आत्महत्या नाही तर…’; धनंजय मुंडेंचं पूजाच्या आत्महत्येबाबत मोठं वक्तव्य!
मला पण बघू दे शिवसेनेत कोण मर्द उरला आहे?- नितेश राणे
पुढील दोन दिवसांत महाराष्ट्रातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता!
रोहित पवार-अहिल्याबाईंसंदर्भात शरद पवार असं काय बोलले?, ज्यामुळे होतेय जोरदार टीका
“…त्या मतदारसंघात जाऊन निवडणूक लढवणं यात पुरुषार्थ आहे का?”
Comments are closed.