बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत म्हणून गिरीश महाजन अजूनही फेट्याने डोळे पुसतायेत”

मुंबई | विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी आज विधानसभेत विशेष अधिवेशन सुरु आहे. भाजप आणि शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार राहुल नार्वेकर हे 164 मते पडून विजयी झाले. राजन साळवी यांना 107 मते पडली. यावेळी त्यांचे अभिनंदन करणारं भाषण अनेकांनी केले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील अभिनंदनाचं भाषण केलं. यावेळी सभागृहात सगळे खळखळून हसले. यावेळी बोलताना अजित पवारांनी तूफान बॅटिंग केली.

फडणवीस-शिंदे सरकारमध्ये भाजप हा मोठा आणि जास्त आमदार असलेला पक्ष आहे. तरी सुद्धा मुख्य खातं हे शिंदे गटाकडे गेल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. या युतीत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार असं संपुर्ण महाराष्ट्राला वाटत होतं. परंतु ऐनवेळी दिल्लीतुन चक्रे फिरली आणि एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली. हे कळल्यावर सर्वच स्तबद्ध झाले. भाजपचे लोक तर रडू लागले. गिरीश महाजन तर अजूनही रडत आहेत. फेटा बांधला आहे, तो काढून काढून ते डोळे पुसत आहेत, असं म्हणत अजित पवारांनी सभागृहात हशा पिकवला.

तसेच यावेळी पवारांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्यावरही निशाणा साधला. तुम्हाला मुख्यमंत्रीपद हवं होतं तर मला एकदा सांगायचं होतं. मी उद्धव ठाकरेंना सांगून तुम्हाला बनवले असते. तिकडे का गेलात? आता पुढच्या रांगेत बसलेले आमच्याकडून तिकडे गेलेले जास्त आहेत. भाजपचे मुळ लोक कमी आहेत. आमच्याकडची हा मंडळी तिकडे मोठ्या पदावर बसली आहेत. हे पाहुन भाजपच्या नेत्यांचे वाईट वाटतं, असा टोलाही त्यांनी लगावला.

पवारांनी यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुक केलं. नार्वेकर शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप असा प्रवास करुन आले आहेत. ते जिकडे जातात त्यांना आपले करतात. कायद्याची जाण असलेला अध्यक्ष आज महाराष्ट्राच्या विधानसभेला मिळालं यांचा आनंद आहे असं पवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या –

शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेतच; खासदार विनायक राऊतांनी केला खुलासा

“कसाबच्या वेळीसुद्धा एवढी सुरक्षा नव्हती, इतकी भीती कशाची”

मोठी बातमी! शिवसेना विरूद्ध शिंदे गटात वादाची नवी ठिणगी

राकेश झुनझुनवालांना मोठा झटका; झालं ‘इतक्या’ कोटींचं नुकसान

“देवेंद्र फडणवीस येतील असं वाटलं होत पण अर्धवट येतील असं वाटलं नव्हतं”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More