मुंबई | हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. आज सभागृहात आमदारांनी एकमेकांना चांगलेच टोले, टोमणे लगावले. तसेच जोरदार फटकेबाजी केली. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाला विदर्भाच्या मुद्द्यावरुन टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. त्यावर प्रत्युत्तर देताना जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजित पवारांचा उल्लेख केला. यानंतर अजित पवारांनी (Aji Pawar) आक्रमकपणे आपली भूमिका मांडली.
Ajit Pawar | अजित पवार आक्रमक
विदर्भाचा विषय सत्तारुढ पक्षाने मांडल्यामुळे आम्ही मांडला नाही. अर्थमंत्र्यांनी काल बीएसीमध्ये सांगितलं की, आम्ही हा प्रस्ताव वेळ नसेल तर विथड्रॉ करतो, आता अध्यक्ष महोदय अजून सभागृह संपलेलं नाही. त्यामुळे चर्चा होणार आहे, असं आम्ही गृहित धरुन आहोत. दहा दिवसांचं अधिवेशन घ्यायचं, तिकडून दोन प्रस्ताव, इतकडून एक प्रस्ताव, एवढं लिमिटेड का? म्हणून आम्ही म्हणत होतो, एक महिना अधिवेशन घ्या, असं जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले.
आम्हालाही आणखी दिवस नागपूरची हवा घेऊ द्या. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आपल्या जागेवरुन उठतात आणि भूमिका मांडतात, त्यावर दोन मिनिट माझं झालेलं नाही, असं जयंत म्हणाले. यानंतर दोघात बसून ठरवा की कोण बोलायचं, बसून ठरवा, असा टोला जयंत पाटील यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
विरोधी पक्षाला कळलं होतं की, अधिवेशन संपणार आहे. त्यांनी अध्यक्षांना सांगायचं होतं की, आम्हाला अंतिम आठवडा प्रस्ताव द्यायचं नाही. इकडे वेगळं बोलायचं आणि बाहेर वेगळं बोलायचं, हे धंदे बंद करा, असं अजित पवार म्हणाले.
Ajit Pawar | जयंत पाटील शांतच बसले
अजित पवारांनी मोठ्या आवाजात आपली भूमिका मांडली. यानंतर जयंत पाटील शांतपणे आपल्या जागेवर जाऊन बसले. यानंतर अजित पवारांनी भूमिका मांडणं सुरूच ठेवलं. अजित पवारांनी भूमिका मांडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा विदर्भाच्या मुद्द्यावरुन निशाणा साधला.
Ajit Pawar | देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
जयंतराव मी या ठिकाणी आपल्या निदर्शनास आणून देतो, आपण जसा पहिला प्रस्ताव दिला, आमचा प्रस्ताव हा शेतकऱ्यांबद्दल होता, तरी तुम्ही शेतकऱ्यांचा प्रस्ताव दिलाच ना? जयंतराव म्हातारी मेल्याचं दु:ख आहेत, पण म्हातारी मेल्यापेक्षा काळ जास्त सुकावत चाललाय याचं दु:ख जास्त आहे, असं ते म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
Jaya Bachchan ने कुटुंबातील ‘या’ व्यक्तीच्या कानाखाली काढला होता जाळ
घटस्फोटाच्या चर्चेनंतर Aishwarya Rai कडून मोठा खुलासा!
Shahid Kapoor | अभिनेता शाहिद कपूरने घेतली सर्वात महागडी कार; किंमत वाचून थक्क व्हाल
Job Alert | 12 वी पास असणाऱ्यांसाठी ISRO मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, असा करा अर्ज
…म्हणून Aishwarya Rai आणि अभिषेक बच्चन घटस्फोट घेणार ; धक्कादायक कारणं समोर