बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तेव्हा कल्याण पण मला म्हणाला असता, दादा तुम्हीही 2 दिवस इकडे नव्हता’; शपथविधीवरुन अजित पवारांची फटकेबाजी

सोलापूर | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणुकीचं वारं सध्या वाहू लागलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ गादेगाव येथे सभा घेतली. त्यावेळी त्यांनी आपल्या विशेष विनोदी शैलीत कार्यक्रमात एकच हशा पिकवला.

“कल्याणराव काळे हे मधल्या काळात भाजपमध्ये होते, तेव्हा वसंतराव काळे यांनी मला विचारलं, अरे अजित, कल्याण कुठे आहे बघ, तेव्हा कल्याण काळे पण मला म्हणाला असता दादा तुम्ही पण नव्हता का 2 दिवस तिकडे गेलेला!” असं म्हणून अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांसोबतच्या पहाटेच्या शपथविधीच्या आठवणींना उजाळा देत आपल्या विशेष शैलीत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला.

सध्या महाराष्ट्रात कोरोनाचं संकट असल्याने राज्य सरकारच्या हातात असलेल्या सहकार विभागाच्या निवडणुका आम्ही लांबणीवर टाकल्या असल्याचंही अजित पवार यांनी बोलून दाखवलं. त्याबरोबरच आता पोटनिवडणुकीच्या मतदानाला जाताना लोकांनी गर्दी करू नये, मास्क वापरावे तसेच मतदान करताना विचार करून उमेदवार निवडावा असं आवाहन त्यांनी जनतेला केलं आहे.

या कार्यक्रमात अजित पवार यांनी भारत भालके यांच्या आठवणींना उजाळा देत ते सर्वसामान्य लोकांसाठी सतत प्रयत्न करत असायचे असं म्हटलं आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ गादेगाव येथील आयोजित सभेत अजित पवारांनी चांगलाच हशा पिकवल्याचं पाहायला मिळालं.

थोडक्यात बातम्या

“फडणवीसांनी कोणत्या जिल्ह्यात लसींचा साठा सर्वाधिक आहे ते दाखवून द्यावं”; जयंत पाटलांचा पलटवार

पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार; नितीन गडकरींनी केली ‘ही’ मोठी घोषणा

“जाणीवपूर्वक लसीकरण बंद करून, लसींच्या बाबतीत चुकीच्या बातम्या पसरविण्याचं कारण काय?”

‘केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी’; नाना पटोले आक्रमक

प्रकाश जावडेकरांचा पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More