मुंबई | गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा कहर पुन्हा दिसायला सुरु झाला आहे. राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत असून कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात २० हजार २११ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्य सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली असून अजित पवार यांनी याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत.
नागरिकांनी शिस्त पाळण्याची गरज आहे, अन्यथा कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. नागरिकांनी त्याबाबतची मानसिकता ठेवावी, लवकरच यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
जगात विविध देशात कोरोनामुळे लॉकडाऊन करावं लागलं आहे, मात्र आपल्याला त्याचं गांभीर्य दिसत नाही. काही गोष्टींबाबत वेळीच निर्णय न घेतल्यास गांभीर्य वाढतं. काही लोक राजकारण करत असल्याचं अजित पवार म्हणाले.
काही लोक शिवजयंतीवर बंधनं का आणता?, अशी वक्तव्यं करत आहेत. कोरोना वाढू नये यासाठी आम्ही ही खबरदारी घेत आहोत. मागील वर्षभर आम्ही अनेक कार्यक्रम रद्द केले आहेत, त्यामुळे राजकारण करण्यासाठी कुणीही भावनिक आधार घेण्याचा प्रयत्न करु नये, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
थोडक्यात बातम्या-
मुंबई-पुण्यानंतर महाराष्ट्रातील ‘या’ भागात कोरोनाचा कहर सुरु
मंत्र्याकडून संसदेतच बलात्काराचा प्रयत्न, महिलेच्या आरोपानं एकच खळबळ
‘कोरोनापेक्षा जास्त घातक भाजप’; खासदार नुसरत जहाँचा भाजपवर निशाणा
‘पदावर बसणाऱ्यांकडूनच महिलांवर अत्याचार होत असतील तर…’; रक्षा खडसे आक्रमक
“स्वयंघोषित ‘जाणता राजा’ शरद पवार यांनी राजकीय स्वार्थासाठी नवा शोध लावला”
Comments are closed.