बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राजकीय कार्यक्रमांवरही लवकरच निर्बंध?, अजित पवारांची महत्त्वाची घोषणा

मुंबई | राज्यात कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढताना दिसत असून गेल्या काही दिवसांमधील आकडेवारी प्रशासनाची चिंता वाढवणारी आहे. अशा पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शिवजयंतीच्या कार्यक्रमावर बंधनं घातली आहेत, मात्र दुसरीकडे राजकीय पक्षाच्या कार्यक्रमांना मात्र मोठी गर्दी होताना पहायला मिळत आहे. यासंदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.

राजकीय कार्यक्रमांना जास्त गर्दी होत असल्याने याकडे अजित पवार यांचे लक्ष वेधण्यात आले होते, यावेळी हा मुद्दा अगदी बरोबर आहे. याला कुठेतरी ब्रेक लागावा यासाठी सर्व पक्षप्रमुखांना एकत्र बसून सांगावे लागेल. राजकीय पक्षांना नियमावली नाही आणि इतर जयंती-पुण्यतिथीवर बंधनं आणली तर लोकांना मान्य होणार नाही. यासाठी मुंबईत राज्य प्रमुखांशी बोलून योग्य निर्णय घेऊ, असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, शिवजयंतीला बंधनं घातल्यानं शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिवार संवाद सभा सुरु असून या कार्यक्रमाला मोठी गर्दी होताना पहायला मिळत आहे.

राज्यात कोरोनाचं संकट वाढत असताना सरकारने सरसकट सर्व कार्यक्रमांवर बंदी आणणं गरजेचं आहे. लोकांना सार्वजनिक कार्यक्रमांसाठी नियमावली आहे, मात्र राजकारणी लोक मात्र कुठल्याही नियमावलीचं पालन करत नाहीत, त्यामुळे लोकांमध्ये संताप असून याची दखल न घेतल्यास सरकारला रोषाचा सामना करावा लागू शकतो.

थोडक्यात बातम्या-

…तर कठोर निर्णय घ्यावे लागतील; अजित पवारांनी दिले मोठे संकेत

मुंबई-पुण्यानंतर महाराष्ट्रातील ‘या’ भागात कोरोनाचा कहर सुरु

मंत्र्याकडून संसदेतच बलात्काराचा प्रयत्न, महिलेच्या आरोपानं एकच खळबळ

‘कोरोनापेक्षा जास्त घातक भाजप’; खासदार नुसरत जहाँचा भाजपवर निशाणा

‘पदावर बसणाऱ्यांकडूनच महिलांवर अत्याचार होत असतील तर…’; रक्षा खडसे आक्रमक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More