…नाहीतर पवारांची औलाद आहे म्हणून सांगणार नाही!

उस्मानाबाद | राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणा. मी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना सौर पंप देण्याचं वचन देतो अन्यथा पवारांची औलाद आहे म्हणून सांगणार नाही, असं अजित पवार म्हणाले. ते उस्मानाबादच्या भूममध्ये बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ताधाऱ्यांविरोधात हल्लाबोल यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केलीय. मराठवाड्यात ही यात्रा काढण्यात येत असून राष्ट्रवादीचे जवळपास सर्वच प्रमुख नेते या यात्रेत सहभागी झालेत. 

दरम्यान, निवडणुका नाहीत तरी आपण एकत्र आलोत. शेतकरी मोडला तर राज्य उद्ध्वस्त होईल, त्यामुळे राष्ट्रवादीने हल्लाबोल आंदोलन सुरु केलंय, असं ते यावेळी म्हणाले.