Pune News | पुण्यातील कल्याणीनगर येथे शनिवारी रात्री भीषण अपघात झाला. एका बिल्डरच्या मुलाने भरधाव वेगाने गाडी चालवत दोन जणांना संपवलं. या हिट अँड रन प्रकरणामुळे देशातील वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर देखील संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांवर (Pune News) देखील आरोप करण्यात आले. आता या प्रकरणी अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माझ्या मुलाने असं कृत्य केलं असतं तरी…- अजित पवार
पुण्यातील कल्याणीनगर (Pune News) येथील अपघात प्रकरणामध्ये आमचा काहीही संबंध नाही. माझ्या मुलाने असं कृत्य केलं असतं तरी कारवाईचे आदेश दिले असते, असं म्हणत अपघात प्रकरणाची चौकशी करून योग्य कायदेशीर निर्णय घेण्याचे आदेश अजित पवारांनी दिलेत.
पुणे पोलिसांच्या (Pune Police) कारवाईवरही अनेकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. पोलिसांनी (Pune Police) चुकीचा तपास केला, पैशांची सेटलमेंट केली असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला त्यानंतर हे प्रकरण चांगलं तापलं.
पोलीस आयुक्तांचं स्पष्टीकरण
या प्रकरणी पोलीस आयुक्तांनी मोठा खुलासा केलाय. वेदांत अग्रवाल याचा ब्लड रिपोर्ट अद्याप आला नसला तरी आमच्याकडे त्याच्याविरोधात भक्कम असे तांत्रिक पुरावे आहेत, असा दावा अमितेश कुमार यांनी केला.
आम्ही वेदांत अग्रवाल याला न्यायालयात सादर केले तेव्हाही त्याने मद्यप्राशन केल्याचे सांगितले. तसेच तो अरुंद रस्त्यावर, विना नंबरप्लेटची गाडी भरधाव वेगाने चालवत होता, या सर्व गोष्टी आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. पण न्यायालयाने वेदांत अग्रवाल याला जामीन दिला, असंही पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलं.
Pune News | नेमकं काय घडलं?
पुणे शहराततील कोरेगाव पार्कमधील कल्याणीनगरमध्ये शनिवारी रात्री अत्यंत भीषण अपघात झाला. भरधाव वेगात पोर्शे कारने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या पोर्शे कारचा चालक हा अल्पवयीन होता. या कारने दुचाकीला एवढ्या जोरात धक्का दिला की या धडक दुचाकीवरील अनिस दुधिया आणि अश्विनी कोस्टा याचा मृत्यू झाला.
महत्त्वाच्या बातम्या-
हातात दारूचा ग्लास अन्…; अपघाताआधीचा पबमधील व्हिडीओ आला समोर
सचिन तेंडुलकरवर गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा इशारा, म्हणाले…
‘…तर सगळे पब, बार बंद करा’; देवेंद्र फडणवीसांचे पुणे पोलिसांना आदेश
गजानन किर्तीकरांचं पुत्रप्रेम अखेर समोर; अगोदर लेकाविरोधात प्रचार केला, आता म्हणतात…
“जुन्या आठवणी विसरणं माझ्यासाठी..”; सलमान अजूनही एक्स गर्लफ्रेंडच्या प्रेमात?